नागपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्रातील एका वाघाला कृत्रिम पंजा बसवण्यात येणार आहे. साहेबराव (वय 10 वर्षे) असे या वाघाचे नाव आहे. शिकऱ्याच्या पिंजऱ्यात पाय अडकल्याने त्याचा पंजा निकामी झाला होता. वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची जगातील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
घटनेनंतर लगेच उपचार करून साहेबरावला नागपूरच्या महाराज बागेत ठेण्यात आले होते. मात्र, पायाला वेदना असल्याने साहेबरावला चालणे अवघड झाले होते. त्यामुळे स्थानिक वन अधिकारी, वन्यजीव संरक्षक आणि पशु चिकीत्सकांच्या चमूने त्याला कृत्रिम पाय बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
पशु चिकित्सक डॉ. शिरीष उपाध्याय हेही वाचा - ताडोबातील मीरा वाघिणीचा मृत्यू; शिकार करताना शिंग लागल्याचा अंदाज
तत्पूर्वी वाघाच्या मज्जातंतूंशी संबंधित वेदना कमी करण्यासाठी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी इंग्लंडच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. पीटर जियानौदिस आणि डॉ. लिडस यांच्या मर्गदर्शनाखाली ७ डॉक्टरांच्या चमूने साहेबराववर शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेची जखम बरी झाल्यानंतर त्याला कृत्रिम पंजा लावला जाईल, अशी माहिती पशु चिकित्सक डॉ. शिरीष उपाध्याय यांनी दिली आहे.
वन अधिकारी, वन्यजीव संरक्षक आणि पशु चिकीत्सकांचा चमू यासाठी वाघाच्या पायाचे मोजमाप देखील घेण्यात आले आहे. फ्रान्स किंवा जर्मनीतून हा पंजा मागवण्यात येणार आहे. खराखुरा वाटण्यासाठी हा पंजा सिलिकॉनपासून बनवला जाणार आहे. सध्या साहेबरावला गोरेवाडा येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळ येथे ठेवण्यात आले आहे.