नागपूर- जगात कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात सुद्धा कोरोना व्हायरस पाय पसरू लागला आहे. मात्र, विदर्भात कोरोना टिकाव धरू शकणार नाही, अशी भूमिका खाकी वेशातील एका कवीने व्यक्त केली आहे.
नागपुरात कोरोनाच्या दहशतीवर वैदर्भीय कवितेचा सावजी तडका - corona poem nagpur
विदर्भातील ऊन, सावजी रस्सा आणि झणझणीत खर्रा कोरोनाच्या व्हायरसवर भारी असल्याची कविता संजय पांडे यांनी तयार केली आहे. संजय पांडे हे नागपूर पोलीस दलात निरीक्षक पदावर कार्यरत असून ते अनेक सामाजिक विषयांवर कविता करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
विदर्भातील ऊन, सावजी रस्सा आणि झणझणीत खर्रा कोरोनाच्या व्हायरसवर भारी असल्याची कविता संजय पांडे यांनी तयार केली आहे. संजय पांडे हे नागपूर पोलीस दलात निरीक्षक पदावर कार्यरत असून ते अनेक सामाजिक विषयांवर कविता करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी गर्दीच्या ठिकाणी जाऊन होळी साजरी करण्याचे टाळावे, असे आवाहन केले जात आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे आयोजित कार्यक्रम रद्द केले जात आहे.
हेही वाचा-थराराक..! नागपुरात गजबजलेल्या चौकात तरुणावर गोळीबार