महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Nude Dance Case : उमरेड नंतर मौदा आणि कुही पोलीस ठाण्यातही आयोजकांवर गुन्हा दाखल - नागपुरात विवस्त्र नृत्य

उमरेड नंतर कुही आणि कामठी तालुक्यात सुद्धा अश्लील बंद शामियाना मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर विवस्त्र डान्स कार्यक्रमाचे आयोजन झाले होते अशी माहिती समोर येताच पोलिसांनी आयोजकांसह काही महिलांची चौकशी सुरू केली करण्यात आली आहे. कार्यक्रमातील अश्लील नृत्य प्रकारात सहभागी असलेल्या कलाकार आणखी किती कार्यक्रमात सहभागी झाले होते यासंदर्भात माहिती पोलीस गोळा करत आहेत.

Nude Dance
Nude Dance

By

Published : Jan 25, 2022, 9:53 AM IST

Updated : Jan 25, 2022, 11:39 AM IST

नागपूर -जिल्ह्यातील उमरेड येथील ब्राम्हणी गावात डान्स हंगामा या संस्कृतीक कार्यक्रमाच्या नावावर विवस्त्र नृत्य ( Nude Dance Case ) करण्यात आल्याची घटना अगदी ताजी असताना कुही आणि मौदा तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी कुही आणि मौदा पोलीस ठाण्यात ( Mauda Police Station ) गुन्हा दाखल केला आहे. अश्लील डान्स प्रकरणात आतापर्यंत ११ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर चार आयोजकांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 26 पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ब्राम्हणी गावात उघडकीस आलेला न्यूड डान्स

कार्यक्रमांच्या व्याप्तीची तपासणी -

उमरेड येथील ब्राम्हणी गावात घडलेल्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कुही तालुक्यातील सिल्ली येथे 16 आणि 17 जानेवारी दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर करण्यात आलेल्या आयोजनात काही तरुण आणि तरुणींनी विवस्त्र होऊन डान्स केला. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या कोणत्याही परवानगी शिवाय या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अश्या अश्लील कार्यक्रमांचे जिल्ह्यात सर्रासपणे आयोजन झाल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असता कामठी तालुक्यातील भुगाव येथे सुद्धा अश्याच प्रकारचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. ज्याच्या आधारे कुही आणि मौदा पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल करून तापस सुरू केला आहे.

हेही वाचा -Nude Dance Nagpur : सकाळी शंकरपट, रात्री 'आशिक बनाया अपने'; डान्स हंगामाच्या तिघांवर गुन्हा दाखल

आयोजकांसह महिलांची चौकशी सुरू -

उमरेड नंतर कुही आणि कामठी तालुक्यात सुद्धा अश्लील बंद शामियाना मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर विवस्त्र डान्स कार्यक्रमाचे आयोजन झाले होते अशी माहिती समोर येताच पोलिसांनी आयोजकांसह काही महिलांची चौकशी सुरू केली करण्यात आली आहे. कार्यक्रमातील अश्लील नृत्य प्रकारात सहभागी असलेल्या कलाकार आणखी किती कार्यक्रमात सहभागी झाले होते यासंदर्भात माहिती पोलीस गोळा करत आहेत.

Last Updated : Jan 25, 2022, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details