महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापौर संदीप जोशी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र - nagpur mayor sandip joshi

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र मिळाले आहे.

ngp
महापौर संदीप जोशी

By

Published : Dec 8, 2019, 7:48 PM IST

नागपूर - नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे निनावी पत्र मिळाले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेचा विरोध करणाऱ्यांनी हे पत्र पाठविल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापौर जोशी यांच्या नावाने आलेले हेच ते निनावी पत्र

महापौर जोशी यांनी शहरातील रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यासाठी अतिक्रणविरोधी मोहीम सुरू केली आहे. तसेच 'स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर' राहण्यासाठी नागरिकांकडून सूचनाही मागवल्या आहेत. या उपक्रमासाठी शहरात विविध १०० ठिकाणी सूचना पेट्या लावण्यात आल्या आहेत. काल या पेट्या उघडण्यात आल्या त्यापैकी ९६ क्रमांकाच्या पेटीमधून हे धमकीचे पत्र मिळाले.

महापौर संदीप जोशी

सदर पत्र हे हिंदी भाषेत हे पत्र लिहिले असून महापौर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला यातून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी महापौर जोश यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर सदर पोलिसांनी तक्रार दाखल करून पत्र पाठविणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - विहिरीत पडलेल्या नीलगाईला बाहेर काढण्यात यश

हेही वाचा - नागपुरात विनापरवाना दारू पुरवणाऱ्या हॉटेलसह मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details