महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : एकीकडे कोरोना तर दुसरीकडे डेंग्यूने डोके काढले वर - लहान मुलांना डेंग्यूची लागण

नागपूर जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत जवळपास 190 जणांना डेंग्यूची लागण झाल्यासे समोर आले आहे. यात जवळपास 300 पेक्षा जास्त संशयितांचे नमुने तपासण्यात आले आहेत.

90 to 100 Dengue cases Reported at nagpur in June month
नागपूर : एकीकडे कोरोना तर दुसरीकडे डेंग्यूने डोके काढले वर

By

Published : Jul 14, 2021, 2:39 AM IST

नागपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत नाही तर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. यातच नागपूर जिल्ह्यात आता डेंग्यूने डोकेवर काढले असून दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. तेच अस्वछता साचलेलं पाणी आणि याकडे होत असलेले दुर्लक्ष हे रुग्ण वाढीस कारणीभूत ठरत आहे. यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर 190 वर असलेली रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यात विशेष म्हणजे लहान मुलांनासुद्धा डेंग्यूची लागण होऊन प्रकृती गंभीर होत असल्याने चिंता वाढली आहे.

शहरातील काही भागात डेंग्यूचे रुग्णसंख्या अधिक
शहरातील काही वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी अस्वच्छता, बांधकाम सुरू असलेल्या साइट्सवर पाणी साचणे, वाहणाऱ्या नाल्यांची स्वच्छता न होणे, नियमितपणे कचऱ्यांची उचल न होणे अशीच परिस्थिती डेंग्यू पसरलेल्या गोंड वस्तीचीच नाही. तर नागपुरातील सदर, गांधी चौक, राजनगर, हुडको कॉलनी, भीमनगर, डिप्टी सिग्नल भांडेवाडी, कळमना, नंदनवन, वाठोडा, वाडी, दाभा या परिसरामध्ये अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना अशाच समस्येला सामोरे जावे लागत आहे.

डेंग्यूने 21 वर्षीय तरुणांचा मृत्यू?
याच वस्तीत राहणारा युवक पियुष गणेश उईके याला जून महिन्याच्या अखेरीस अचानक त्याला ताप आला. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, मात्र, उपचारात त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. सुरुवातीला औषधोपचाराला प्रतिसाद देणाऱ्या पियुषची अवस्था नंतर खालवत गेली आणि चार जुलै रोजी खाजगी रुग्णालयात त्याचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे वडील गणेश उईके यांनी सांगितलं.

नागपुरात डेंग्यूने डोके काढले वर
डेंग्यूची लहान मुलांना सुद्धा होत आहे लागणडेंग्यूची लागण फक्त मोठ्याना होते असे नाही. यात काही सहा महिन्यांच्या बाळापासून सुद्धा रुग्ण येत असल्याने नागपुरचे बालरोग तज्ञ डॉ. वसंत खडतकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना सांगितले. यात सध्याच्या घडीला सहा महिन्याच्या 2 बाळांवर उपचार आहेत. आतापर्यंत 15 ते 16 लहान मुलांना डेंग्यूचे लागण झाली असल्याचे त्यांनी सांगितलं. यासोबत लहान मुलांमध्ये एमआयएस म्हणजेच मल्टीसिस्टम इंफ्लेमेंट्री सिन्ड्रोममुळे काही गंभीर परिस्थिती उद्धभवत असल्याचेही डॉ. खडतकर यांनी सांगितलं. पण योग्य उपचारामुळे ते बरे झाले हे सुद्धा होतात असेही त्यांनी आवर्जून सांगितलं. या संदर्भातील आकडेवारीनागपूर जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत जवळपास 190 जणांना डेंग्यूची लागण झाल्यासे समोर आले आहे. यात जवळपास 300 पेक्षा जास्त संशयितांचे नमुने तपासण्यात आले आहेत. 90 ते 100 जण हे मागील जून ते जुलै या कालावधीत डेंग्यूमुळे आजारी झाले आहेत. यासोबत नागपुरच्या ग्रामीण भागातही रुग्ण आढळून आलेले आहेत. यात सरकारी आकडेवारीत 3 डेंग्यू संशयीतांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात नागपूर शहर आणि जिल्ह्याचा आवक पाहता खाजगी रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांची नोंद झालेली दिसून येत नाही. यामुळे या लागण झालेल्या रुग्णाचा डाटा एकत्र केल्यानंतर तसेच मृत्यूचे समितीकडून ऑडिट केल्यानंतर यामध्ये नक्कीच वाढ होणार यात शंका नाही.डेंग्यूचे लक्षणेडोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप चढउतार होणे, भूक कमी होणे, यासारखे लक्षणे दिसल्यास तपासणी करण्याचे आवाहन केले जात आहे. याकडे दुर्लक्ष करणे कोरोनाला प्रमाणेच किंवा त्यापेक्षा गंभीर परिणामांना आमंत्रण दिल्यासारखे होईल, असे वैदकीय तज्ञांनी सांगितलं. यामुळे वेळीच वैदकीय उपचार घेण्याचे आवाहन केले जात आहे.काही घरघुती उपायकाही लक्षणे दिसताच वेळीच तपासणी आणि योग्य निदान होणे गरजेचे आहे. या सोबतच घर आणि आजूबाजूच्या परिसर स्वछ ठेवल्यास डेंग्यूपासून बचाव होऊ शकतो. नागरिकांनी पाणी साचून राहणारे ठिकाण शोधून कोरडे करावे. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, पाण्याच्या स्रोत असल्यास गप्पी मासे सोडावे, असे हिवताप अधिकारी प्रज्ञा नासरे यांनी सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details