नागपूर - जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील शॉपिंग सेंटर, भाजी मंडीला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. यामध्ये जवळपास ९ दुकाने जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.
काटोलमध्ये मध्यरात्री भीषण आग, 9 दुकाने जळून खाक - काटोल आग
नागपुरातील काटोलमध्ये भाजी मंडीला आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये ९ दुकाने जळून खाक झाली असून जवळपास ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

काटोलमध्ये मध्यरात्री भीषण आग, 9 दुकाने जळून खाक
काटोलमध्ये मध्यरात्री भीषण आग, 9 दुकाने जळून खाक
मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग विझवण्यात आली. याठिकाणी भाजी मंडी असल्याने नेहमी लोकांची गर्दी असते. मात्र, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, आगीमध्ये भाजी, चप्पल, कुशन आदीची ९ दुकाने जळाली. तसेच आगीत सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानदारांनी व्यक्त केला आहे.