नागपूर - जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी घडली.
जि.प शाळेवर वीज कोसळून 8 विद्यार्थी जखमी, तर 2 गंभीर; नागपूरमधील रामटेक तालुक्यातील प्रकार - कोसळली
रामटेक तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ वीज कोसळल्याने आठ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी नयन कडबे व तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
आसोली येथील जिल्हा परिषद शाळा
गुरुवारी दुपारपासून रामटेक आणि मौदा तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यादरम्यान आसोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. या दुर्घटनेत पहिल्या ते चवथ्या वर्गातील आठ विद्यार्थी जखमी झाले. नयन कडबे व तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.