नागपूर- जगभरात प्रचंड वेगाने संसर्ग झालेला कोरोना विषाणू हजारो लोकांचे बळी घेत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशास्थितीत रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र, त्याचा भारतात तुटवडा आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून नागपूरच्या डॉक्टरांनी एका व्हेंटिलेटवरून 8 रुग्णांना प्राणवायू मिळणारे उपकरण शोधले आहे.
Good News : एका व्हेंटिलेटरमधून 8 रुग्णांना मिळणार प्राणवायू, नागपूरमधील डॉक्टरांची किमया - नागपूर जिल्हा बातमी
नागपूरचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपाय शोधून काढला आहे. डॉ. संचेती यांनी व्हेंटिलेटरला लावण्यात येणार एक नवं स्पिल्टर विकसित केले आहे. ज्यामुळे एकाच व्हेंटिलेटरवरून एकाच वेळी 8 रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.

साधारण व्हेंटिलेटरला एक इनलेट असतो आणि एक आऊटलेट असतो. त्याला ट्यूब लावून आपण एक रुग्णाला व्हेंटिलेट करतो. मात्र, या व्हेंटिलेटरला स्पिलटर लावून एकाच व्हेंटिलेटरवरून 8 जणांना कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरविणे शक्य होणार आहे. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमधून ही संकल्पना प्रत्यक्षात समोर आली आहे. या व्हेंटिलेटरबद्दल राज्यभरातून विचारणा होत आहे.