महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Har Ghar Tiranga : 75 शाळांमध्ये पोहचले 75 अधिकारी, 'हर घर तिरंगा' फडकविण्यास विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहीत - Amrit Mohotsav

स्वातंत्र्याचा 'अमृत महोत्सव' (Amrit Mohotsav) वर्षा निमित्ताने नागपूरात जिल्हा प्रशासनातर्फे आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील काही दिवस जिल्हा प्रशासनाचे ७५ अधिकारी रोज ७५ शाळांना (75 officers reached 75 schools) भेट देणार आहे. आणि घरोघरी तिरंगा (Har Ghar Tiranga) फडकविण्यासाठी विद्यार्थ्यांना (encouraging students to hoist tricolor) प्रोत्साहित करणार आहेत.

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा

By

Published : Aug 6, 2022, 2:04 PM IST

Updated : Aug 6, 2022, 5:19 PM IST

नागपूर :क्रांतिकारकांचे तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्यावतीने 'आझादी का अमृत महोत्सव' (Amrit Mohotsav) हे व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) उपक्रम राबवला जाणार आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने देखील आपला मोलाचा वाटा यामध्ये देण्याचे ठरवले आहे. नागपूरात जिल्हा प्रशासनाचे ७५ अधिकारी रोज ७५ शाळांना (75 officers reached 75 schools) भेट देणार आहे. आणि घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी विद्यार्थ्यांना (encouraging students to hoist tricolor) प्रोत्साहित करणार आहेत.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला

नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी वायूसेना नगर सेमिनरी हिल्स येथील केंद्रीय विद्यालयात जाऊन, विद्यार्थ्यांना 'हर घर तिरंगा' अभियाना बद्दल माहिती दिली आहे. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी, काटोल रोडवरील जिल्हा परिषद हायस्कुल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय उपायुक्त,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, नगरपरिषदचे मुख्याधिकारी व इतर शासकीय अधिकारी असे एकूण ७५ मोठ्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शाळांमध्ये जाऊन, 'हर घर तिरंगा' या अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


'हर घर तिरंगा' अभियानात विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे :शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून देणे आणि अमृत महोत्सवी वर्षाची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या, या अभियानात विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांकडे घरावर तिरंगा लावण्यासाठी आग्रह धरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. घरोघरी तिरंगा अभियानात विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा :Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा मोहिमेने उजाडले छिंदीया गावाचे भाग्य, पाच लाख बांबूंची मिळाली ऑर्डर

Last Updated : Aug 6, 2022, 5:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details