महाराष्ट्र

maharashtra

नागपूरमध्ये 24 तासात 698 कोरोनाबाधितांची नोंद, शारजाह येथून आलेले 15 कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Jan 8, 2022, 4:40 PM IST

नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोनाचा उद्रेक झाल्याची बाब समोर आली आहे. यात 698 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये शारजाह येथून आलेल्या 94 पैकी 15 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आढळले आहे.

nagpur corona
nagpur corona

नागपूर -नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोनाचा उद्रेक झाल्याची बाब समोर आली आहे. यात 698 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये शारजाह येथून आलेल्या 94 पैकी 15 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आढळले आहे.

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नोंदवले गेले होते. एक जानेवारीपासून नागपुरात पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यात 1 तारखेला 27 बाधित मिळून आले असून आता हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. मागील आठ दिवसात रुग्णसंख्या वाढून 700 च्या घरात पोहोचली आहे. तसेच ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या वाढून 2016 इतकी झाली आहे.

नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर शुक्रवारी 94 प्रवासी हे शारजाह येथून उतरले. यावेळी खबरदारी म्हणून कोविड प्रोटोकॉलनुसार 94 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये 14 जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. 14 पैकी 11 जण हे एकाच कुटुंबातील आहेत. यात हे कुटुंब नागपूरच्या सतरंजीपुरा भागातील रहिवासी आहे. या सर्वांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details