महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! गुरुवारी कोरोनामुळे नागपुरात ६० रुग्णांचा मृत्यू - नागपूर कोरोना घडामोडी

मृत्यूचा हा आकडा या वर्षातील सर्वाधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गेल्या २४ तासात ३६३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २९२८ कोरोनाबाधितांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.

नागपूर
नागपूर

By

Published : Apr 1, 2021, 10:07 PM IST

नागपूर- आज (गुरुवारी) पुन्हा एकदा उपराजधानी नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी तब्बल ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचा हा आकडा या वर्षातील सर्वाधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गेल्या २४ तासात ३६३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २९२८ कोरोनाबाधितांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडे सुसाट वेगाने वाढत असल्याने आता शासकीय आणि खासगी रुग्णालयात एकही बेड उपलब्ध राहिलेला नसल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी नागपूर शहरात आणि जिल्हात ३६३० रुग्णांची नोंद झाली आहे. आज तब्बल १७८७८ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये १३९३० इतक्या आरटीपीसीआर आणि ३९४८ अँटीजेन चाचणीचा समावेश आहे. आज बाधित झालेल्या नागरिकांमध्ये ११४५ रुग्ण ग्रामीण नागपूरचे तर २४८१ रुग्ण हे नागपूर महानगरपालिका हद्दीतील आहेत. आज ६० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या ही ५१५८ इतकी झाली आहे.
लोकांमध्ये अजूनही गांभीर्य नाही
कोरोना नियमांचे पालन करण्यात नागरिक कमी पडत आहेत. वारंवार सांगून देखील सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसून येत आहे. मात्र, अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यास महापालिका देखील उत्सुक दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये कोरोनाचे गंभीर राहिलेले नाही. मात्र, वाढलेला मृत्यूदर प्रत्येकाला चिंतेत टाकणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details