नागपूर -आजपासून पाच ते आठवा वर्ग असणाऱ्या शाळांना सुरुवात झाली आहे. यात ग्रामीण भागातील शाळांचा समावेश असून, कोरोनामुळे बंद झालेल्या शाळांमध्ये आजपासून शिकवणीला सुरुवात झाली. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थी पोहचले असले, तरी काही शाळांमध्ये थर्मल स्कॅनर, ऑक्सिजन मीटर, भित्ती पत्र पोहचले नाही.
हेही वाचा -लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहायक वस्त्रोद्योग आयुक्तांना अटक
नागपूर जिल्ह्यामध्ये साधारण अठराशेच्या घरात शाळा आहे. या शाळांची दीड लाखाच्या घरात पटसंख्या आहे. तेच या विद्यार्थ्यांना शिकवणारे साधारण 16 हजार शिक्षक आहेत. यात 33 हजार 916 विद्यार्थी व 5 हजार 854 शिक्षक हे पहिल्या दिवशी उपस्थित होते. यात 5 हजार 797 शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झाली असून यात 65 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
काय काळजी घ्यायची होती....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करताना काही महत्वाच्या बाबींचे पालन करायचे होते. यात शाळा निर्जंतुकीकरण करून घेणे, यासोबत वर्गखोलीत सामाजिक अंतर ठेवणे, बसताना झेड पद्धतीने बैठक व्यवस्था करणे, हात स्वच्छ धुणे, पिण्याचे पाणी सोबत आणणे आदी बाबी सांगण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थी, शिक्षक कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गण, सॅनिटायझर, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भित्ती पत्रके आधी वितरित करण्यात येणार होते, पण ते साहित्य जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये पोहचले नसल्याचे वाडी येथील शाळेचा आढावा घेतला असता समोर आले.