महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात कोरोनाचा धुमाकूळ; एका दिवसात 54 मृत्यू - नागपूर कोरोना रूग्णसंख्या बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावले. असे असतानाही नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळत आहेत.

Nagpur Corona update
नागपूर कोरोना अपडेट

By

Published : Mar 28, 2021, 9:43 AM IST

नागपूर - उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या अतिशय वेगात वाढत आहे. शनिवारी आलेल्यात अहवालात एका दिवसात 54 जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांचा बेफिकीरपणा याला जबाबदार असल्याचे दिसते आहे तर, प्रशासनाच्या उपाया योजना अजूनही कमी पडत आहेत. नागपूर जिल्ह्यात शनिवारी 3 हजार 688 नवीन बाधितांची नोंद झाली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

नागपुरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे
गेल्या काही दिवसात नागपूर शहरासह ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात 16 हजार 535 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरी भागात 2 हजार 595 तर, ग्रामीण भागात 1 हजार 89 आणि चार जिल्ह्याबाहेरील रूग्णांची भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 हजार 873 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, अ‌ॅक्टिव रूग्णांची संख्या 37 हजाराच्या जवळ गेली आहे.

बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या -

नागपुरात मृत्यू तांडव सुरू झाले असून रूग्णांना बेड न मिळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. केवळ 10 ते 15 टक्के लोकांना त्रास होऊन दवाखण्यात दाखल करावे लागत आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर होत चालल्याचे चित्र आहे.

पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांत देखील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. भंडारा जिल्ह्यात शनिवारी 200 रूग्ण आढळले. चंद्रपूर 223, गोंदिया 97, वर्धा 237, गडचिरोलीत 245 बाधित सापडले. तर, 3 हजार 734 जणांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details