नागपूर- कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यातील बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. याबाबत शासनाकडून मदत म्हणून पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात येते. या पार्श्वभूमीवर नागपुरातील अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुबीयांना ५० लाखाचा धनादेश आज सूपुर्द करण्यात आला. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पोलीस जिमखाना येथे हा धनादेश देण्यात आला.
नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाखाची मदत - Police Family Assistance Nagpur
मदत केलेल्यांमध्ये शहरातील पारडी, शांतीनगर, सक्करधरा या पोलीस ठाण्यामध्ये कार्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. यावेळी नागपूर पोलीस विभागातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाखाची मदत
पुढील काळात कोणतीही मदत लागल्यास पोलीस विभाग आपल्या सोबत असल्याची शाश्वती यावेळी पोलीस आयुक्तांनी कुटुंबीयांना दिली. मदत केलेल्यांमध्ये शहरातील पारडी, शांतीनगर, सक्करधरा या पोलीस ठाण्यामध्ये कार्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. यावेळी नागपूर पोलीस विभागातील सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा-नागपुरात अट्टल वाहन चोरटा गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई