नागपूर- नागपुरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता मात्र, आता मे महिन्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी 470 बाधितांची नोंद करण्यात आली असून सध्या शहरातील रुग्णसंख्या ग्रामीण भागापेक्षा कमी झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्याही घटली असून रिकव्हरी रेट 95.51 टक्के आहे.
नागपुरात 470 नवे कोरोना बाधितांंची नोंद तर रिकव्हरी रेट 95.51 टक्के - nagpur corona count
जिल्ह्यात गुरुवारी 14 हजार 145 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 470 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 213 तर ग्रामीण भागातील 246 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 25 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
गुरुवारीजिल्ह्यात 470 रुग्णांची नोंद
जिल्ह्यात गुरुवारी 14 हजार 145 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 470 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 213 तर ग्रामीण भागातील 246 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 25 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यामध्ये शहरी भागात 4, ग्रामीण भागात 10 तर जिल्हाबाहेरील 11 जण हे कोरोनामुळे दगावले आहे.1981 बरे होणाऱ्यांपैकी शहरात 781 तर ग्रामीण 1200 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 10 हजार 848 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 72 हजार 011 जण रुग्ण कोरोना बाधित झाले असून 4 लाख 52 हजार 341 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. तर आतापर्यंत 8822 जणांचा मृत्यू झाला आहे.
पूर्व विदर्भात पॉझिटिव्ही दर 5.26 टक्के वर
पूर्व विदर्भात 3 हजार 637 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये 1 हजार 382 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 53 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. बाधितांच्या तुलेनेत 2 हजार 255 रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत असून 5.26 टक्क्यांवर आला आहे. यामुळे आता नक्कीच कोरनाची लाट ओसरल्यात असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.