महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपराजधानीत कोरोनाचा मोठा उद्रेक; एका दिवसात सापडले 4 हजार रूग्ण - नागपूर कोरोना उद्रेक न्यूज

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावले. असे असतानाही नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळत आहेत.

Nagpur Corona Update
नागपूर कोरोना अपडेट

By

Published : Mar 27, 2021, 11:04 AM IST

नागपूर -उपराजधानी नागपुरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस विक्रमी रूग्णसंख्येची नोंद होत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात नागपूरमध्ये 4 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, पूर्व विदर्भात ही संख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये 35 जणांचा मृत्यू झाला.

उपराजधानीत कोरोनाचा मोठा उद्रेक
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी 17 हजार 625 कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यापैकी शहरात 2 हजार 966 तर, ग्रामीण भागात 1 हजार 126 कोरोनाबाधित आढळले. रूग्णवाढीचा हा नवीन विक्रम झाला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 4 हजार 819 कोरोना बाधितांचे मृत्यू झाले आहेत तर, अ‌ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 36 हजार 936 वर जाऊन पोहचली आहे.पूर्व विदर्भात शुक्रवारी 5 हजार 39 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. वर्ध्यात 289, भंडारा 285, चंद्रपूर 212, गोंदिया 96, गडचिरोली 62 बाधित आढळले आहेत. नागपुरात 35 तर इतर जिल्ह्यांत 10 असे एकूण 45 बाधितांचे मृत्यू झाले.

राज्यातील कोरोना स्थिती बिकट -

गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकाने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र होते. आता पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 8 ते 9 टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. मात्र, सध्या देशातील 60 टक्के कोरोना रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने उपाय योजानाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होत आहेत. जास्त रूग्ण असलेल्या काही शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा -राज्यातील 5 आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ABOUT THE AUTHOR

...view details