नागपूर -कोराडी परिसरातून दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे. बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये सापडला आहे. कोराडी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे.
बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर हा चार वर्षीय चिमुकला घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. बॉबी कुठेही दिसत नसल्याचे त्याच्या पालकांसह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण कोराडी परिसर पिंजून काढला आहे. मात्र बॉबीचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे बॉबी हरवल्याची तक्रार कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून बॉबीचा शोध घेतला. मात्र पोलिसांना सुद्धा बॉबीचा कोणताही सुगावा लागला नाही. मात्र आज बॉबीचा मृतदेह कोलार नदीच्या कॅनलमध्ये मिळाला आहे.
अपघात की घातपात? तपास सुरू