नागपूर - जिल्ह्यातील अदासा येथे शुक्रवारी दुपारी ४ महिला मजुरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर, २ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या महिलांची नावे अद्याप पुढे आलेली नाहीत.
अदासा येथे लघु पाटबंधारे विभागाचा बंधारा (छोटा बांध) बांधला जात असताना दुपारी अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या ठिकाणी ६ महिला काम करत होत्या. ढिगारा कोसळल्याने या सहाहीजणी त्याखाली दबल्या. त्यापैकी दोघींना वाचवण्यात यश आले. मात्र, इतर ४ महिला मजूर माती खाली दबून त्यांचा मृत्यू झाला.