महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अधिवेशनाचा दुसरा दिवस ठरला वादळी, विधानभवनावर धडकले 4 मोर्चे - नागपूर जिल्हा बातमी

गेल्या 18 वर्षांपासून या शिक्षकांना दमडीसुद्धा मिळत नाही, कोणी वेटरचे काम करतो आहे, तर कोणी शेती करत आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

4 unions marched to Vidhan Bhavan
अधिवेशनाचा दुसरा दिवस ठरला वादळी

By

Published : Dec 17, 2019, 10:33 PM IST

नागपूर- महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला आहे. भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तर अनेक मागण्या घेऊन विधानभवनावर एकूण 4 मोर्चे धडकले. या मोर्चांमध्ये लक्षवेधी मोर्चा होता तो महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचा. अनुदान मंजूर झालेल्या उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे, ही प्रमुख मागणी या आंदोलकांनी केली.

विधानभवनावर धडकले 4 मोर्चे

हेही वाचा - कोस्टल हायवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट - एकनाथ शिंदे

गेल्या 18 वर्षांपासून या शिक्षकांना दमडीसुद्धा मिळत नाही, कोणी वेटरचे काम करतो आहे, तर कोणी शेती करत आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

या ठिकाणचा दुसरा मोर्चा होता तो 'व्होकेशन इन्स्ट्रकटर्स टीचर्स असोसिएशन'चा एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रमातील पूर्ण वेळ शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार पगार मंजूर करावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

हेही वाचा - 'सत्तेत असताना 'सामना' वाचला असता, तर सत्ताही वाचली असती'

मानवाधिकार संघटनेने या ठिकाणी मोर्चा काढला. तर चौथा मोर्चा 'विकलांग कृती समिती'चा होता. विकलांगांना उद्योगासाठी परवानगी द्यावी, उद्योगांसाठी अनुदान द्यावे तसेच दिव्यांगाच्या मुलांचे शिक्षण मोफत करावे, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details