नागपूर- महानगरपालिकेच्या ४ हजारांवर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांना नियमित तत्वावर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सत्ता पक्ष नेते संदीप जोशी यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत दिली.
सुमारे ४ हजार ४०७ रोजंदारीवर (ऐवजदार) आहेत. त्या पैकी ज्यांची सेवा २० वर्षे झाली आहे, अशा कामगारांना सर्वांना कायम करणार, असल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर शासनाने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - खड्ड्यांमुळे नागपूरकरांची दमछाक, न्यायालयाने महापालिकेला फटकारले
पालिकेच्या ईतिहासातील हा मोठा निर्णय मानला जात आहे. आचारसंहिता लागताच कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची प्रक्रीया थांबविली जाईल, तसेच आचारसंहिता संपताच शासन यावर अंबालबजावणी करेल, अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली. नागपूर पालिकेच्या कामगारांप्रमाणेच इतरही पालिका कर्मचारी टप्याटप्याने स्थायी म्हणजेच कायम होणार, असे त्यांनी संगीतले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव निवडणुकीच्या तोंडावर पारित करण्यात आला आहे.