महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Murder Ratio Decreased : दिलासादायक बातमी, नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये 33 टक्क्यांची घट

महाराष्ट्राचे क्राईम कॅपिटल (Maharashtra Crime Capital) असलेल्या नागपूर शहरातील गुन्हेगारी (Nagpur City Crime) आणि गुन्हेगार पोलीस कारवाईमुळे चांगलेच थंडावले (33 percent reduction in murder incidents) आहेत, असा दावा शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (CP Amitesh Kumar on Nagpur City Crime) यांनी आकड्यांनीशी केला आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सरासरी 8 ते 9 हत्या होतात. यावर्षी 2 हत्या झाल्या आहेत. Murder Ratio Decreased in Nagpur, Nagpur Crime, Latest news from Nagpur

Amiteshkumar, Nagpur CP
अमितेशकुमार, नागपूर पोलीस आयुक्त

By

Published : Nov 4, 2022, 5:43 PM IST

नागपूर : महाराष्ट्राचे क्राईम कॅपिटल (Maharashtra Crime Capital) असलेल्या नागपूर शहरातील गुन्हेगारी (Nagpur City Crime) आणि गुन्हेगार पोलीस कारवाईमुळे चांगलेच थंडावले (33 percent reduction in murder incidents) आहेत, असा दावा शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (CP Amitesh Kumar on Nagpur City Crime) यांनी आकड्यांनीशी केला आहे. गेल्या वीस वर्षातील मेजर हेड्समध्ये सर्वांत कमी गुन्हे यावर्षी घडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी नागपूरात सरासरी शंभर खूनाच्या घटना घडतात. मात्र यावर्षी हा आकडा 40 टक्के घटण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या 10 महिन्यात एकूण 53 हत्या झाल्या आहेत. गेल्या 20 वर्षांत सर्वांत कमी आकडा आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सरासरी 8 ते 9 हत्या होतात. यावर्षी 2 हत्या झाल्या आहेत. Murder Ratio Decreased in Nagpur, Nagpur Crime, Latest news from Nagpur

नागपूर शहरातील घटलेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना शहर पोलीस आयुक्त

नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट -नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार हत्येच्या घटनांमध्ये उपराजधानी नागपूर शहर अव्वलस्थावर असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हत्येच्या घटनांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, हे देखील महत्वाचे आहे. 1 जानेवारी ते 31 ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण 53 हत्येच्या घटना घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी पाच ते सहा हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही. मात्र, त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना कमी होताना दिसत आहेत.


दर महिन्याला सरासरी 5 ते 6 हत्या:राज्याची उपराजधानी नागपूर शहर गुन्हेगारी विश्वाची राजधानी म्हणून गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध झाले आहे. दर महिन्याला 8 ते 10 हत्येच्या घटना नागपुरात घडत असतात,त्या हिशोबाने वर्षाला सरासरी शंभर हत्या होतात. मात्र,यावर्षी या आकड्यात घट होण्याची शक्यता असली तरी दहा महिन्यात 53 हत्या झाल्यामुळे पोलिसांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित तर केलेच जाईल.

मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हत्या :नागपूर शहरात दर महिन्यात सरासरी हत्येच्या 5 ते 6 घटनांची नोंद आहे. त्यातही फेब्रुवारी मध्ये एकही हत्या झाली नाही. मात्र,मार्च महिन्यात सर्व कसर भरून निघाली होती. एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक 11 हत्येच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात 5, फेब्रुवारीमध्ये 0, मार्च महिन्यात 11, एप्रिल महिन्यात 4, मे मध्ये 6, जून महिन्यात 4 तर जुलै महिन्यात 8 ऑगस्ट महिन्यात 7, सप्टेंबर महिन्यात 6 हत्या आणि ऑक्टोबर महिन्यात 2 हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे.


पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हे घटले :गेल्या दोन वर्षाच्या काळात नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड करून त्यांच्यावर मकोका आणि प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत सुमारे दोनशे गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. मोठ्या प्रमाणात गुंडांना तडीपार देखील केलं आहे. तर अनेक मोठे गुंड सध्या कारागृहात कैद असल्याने त्यांच्या टोळ्या आता सक्रिय नाहीत त्यामुळे एकूणचं गुन्हेगारी घटना कमी झाल्या असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details