नागपूर- प्रेमात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचा खून करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली. कामठी पोलिसांनी याप्रकरणी तिघांना घटनास्थळावरून अटक केली आहे.
प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, पत्नीसह प्रियकराला अटक - murder cases in nagpur
प्रेमात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याचा खून करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली.
राजू हरिदास उरकुडे असे मृताचे नाव असून, ते कामठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कामाला होते. मृत राजू आपली पत्नी शुभांगीसह पाच वर्षाच्या मुलासोबत नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भीमनगर येथे राहायला होते. गेल्या काही दिवसांपासून राजूचे शुभांगीसोबत कौटुंबीक कारणावरून वाद सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत राजू हा संपूर्ण कुटुंबासह शासकीय वसाहतीत राहत होते. त्याच वसाहतीत राहणाऱ्या रुपेश बिहारा याच्यासोबत शुभांगीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागताच मृत राजुने ती वसाहत सोडून भाड्याने केलेल्या खोलीत राहायला सुरूवात केली होती. मात्र, इथेसुद्धा तोच प्रकार सुरू असल्याने राजू आणि शुभांगीमध्ये वाद सुरू झाले होते. काल रात्री (गुरुवार) दोनच्या सुमारास मृत राजुची पत्नी शुभांगीने तिचा प्रियकर रुपेश आणि त्याचा चुलत भाऊ हरिशचंद्र याला बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी राजुचे हात-पाय बांधले आणि उशीच्या मदतीने त्याचे तोंड दाबून त्याचा खून केला. घटनेची माहिती समजताच नवीन कामठी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तीनही आरोपी घटनास्थळीच आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली.