महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात सोमवारी ३ कोरोनाबाधितांची भर; तर तिघांना डिस्चार्ज, बाधितांचा आकडा २९८ - नागपूर लेटेस्ट न्युज

एकीकडे कोरोना बधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील समाधानकारक आहे. सोमवारी नागपुरात 3 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एक 50 वर्षीय पुरुष, 60 व 17 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

nagpur corona update  नागपूर कोरोना अपडेट  कोरोना अपडेट विदर्भ  corona update vidarbha  nagpur corona death  nagpur corona positive cases  नागपूर कोरोनामुळे झालेले मृत्यू  नागपूर लेटेस्ट न्युज  nagpur latest news
नागपुरात सोमवारी ३ कोरोनाबाधितांची भर, तर तिघांना डिस्चार्ज

By

Published : May 12, 2020, 10:19 AM IST

Updated : May 12, 2020, 2:11 PM IST

नागपूर - शहरात सोमवारी दिवसभरात तीन कोरोना रुग्णांची भर पडली, तर तिघांनी कोरोनाव यशस्वीपणे मात केली. तसेच एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९८ वर पोहोचली आहे.

नागपुरात सोमवारी ३ कोरोनाबाधितांची भर; तर तिघांना डिस्चार्ज, बाधितांचा आकडा २९८

शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १०० वर असलेल्या रुग्ण आता ३०० च्या जवळपास पोहोचले आहे. ४ दिवसांपूर्वी पार्वती नगर परिसरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करून फवारणी करण्यात आली. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. हे रुग्ण मोमीनपुरा परिसरातील असून त्यांना आधीच क्वारंटाईन केले होते.

एकीकडे कोरोना बधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील समाधानकारक आहे. सोमवारी नागपुरात 3 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एक 50 वर्षीय पुरुष, 60 व 17 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नागपुरातील कोरोनाची सद्यस्थिती -

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २९८

कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ९३

मृत्यू - ०३

Last Updated : May 12, 2020, 2:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details