नागपूर -धुलीवंदन नंतर नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याचा बघायला मिळाली होती. मात्र केवळ एक दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी परत नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासात नागपूरमध्ये २ हजार ८८५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपूर मृत्यूचे आकडे वाढत असताना देखील पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात बुधवारीही मोठी वाढ मंगळवारी नागपुरात केवळ १ हजार १५६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. होळी निमित्ताने अनेक कोरोना चाचणी केंद्र बंद असल्याने कोरोना बधितांचा संख्या आणि चाचण्यांची संख्या देखील रोडावली होती. मात्र आज परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' झाली आहे. बुधवारी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात २ हजार ८८५ नविन कोरोनाबधितांचा नोंद करण्यात आली आहे. बुधवारी कोरोना रुग्ण संख्येप्रमाणचे चाचण्यांचे संख्या देखील वाढली आहे. आज एकूण १६ हजार ८५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. सुखद बाब म्हणजे, बुधवारी १ हजार ७०५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे सध्या नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ३९ हजार ३३१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृत्यूच्या वाढत्या आकड्यांमुळे दहशत
गेल्या आठ दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात दरदिवशी ५० पेक्षा जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. आज देखील नागपूर शहरात ५८ कोरोना बाधित रुग्ण दगावले आहेत. शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांची क्षमता संपलेली असल्याने अनेकांना होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारावा लागतो आहे. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळायला अडचण होत असल्याने सुद्धा नागपुरातील मृत्यू दर वाढीस लागल्याचे समोर येत आहे.