महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहफुलची २६९ लिटर दारू जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात २६९ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक

By

Published : Oct 17, 2019, 3:28 PM IST

नागपूर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगपुरात २६९ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. पाचपावली पोलिसांनी ५ ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम


याप्रकरणी ४ महिला आणि १ पुरुष असे ५ लोकांना ताब्यात घेतले आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकत मोहफुलांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली. आषुतोश गजभिये (वय - 21 वर्षे), पुष्पा नागराज ( वय 44 वर्षे), तितली गौर (वय 45 वर्षे), इंदिरा मुटकरे (वय 50 वर्षे) आणि भाग्यलक्षी नायडू (वय - 50 वर्षे), असे ताब्यात घेतलेलेल्या दारू तस्करांची नाव आहेत. प्रत्येकी ९० एमएलच्या एकूण ९० बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलीस निरिक्षक अशोक मेश्राम यांनी दिली.

हेही वाचा - नागपूर : महापालिका मुख्यालयाच्या आवारात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details