नागपूर :विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात (Bus Accident in Buldhana) झाल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे 26 प्रवाशांचा मृत्यू झाला तर केवळ 3 प्रवासी वाचले. बसचा अपघात झाल्यानंतर बसच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. ट्रॅव्हल्स बसेसना मुख्य प्रवेशद्वारासह दोन आपत्कालीन दरवाजे असणे आवश्यक आहे. याशिवाय खिडकीच्या काचा फोडण्यासाठी हातोडा किंवा इतर लोखंडी वस्तू असणे आवश्यक आहे.
आमच्या गाडीला दोन एमरजन्सी दरवाजे आहेत. काच फोडण्यासाठी देखील सिस्टीम आमच्या बसला आहे. अपघातानंतर बस एका साईडला पलटी झाल्याने प्रवाशी बाहेर पडू शकले नसावेत - बस चालक, खासगी बस
टायर अचानक फुटल्याने बस पलटी : विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची बस पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा येथे बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस पलटी झाली. अपघात झाला, तेव्हा मध्यरात्रीची वेळ होती. या अपघातामुळे प्रवासी बाहेर पडू शकले नसल्याचा अंदाज एका चालकाने व्यक्त केला. प्रवासाला निघण्यापूर्वी दररोज बसची तपासणी केली जाते, असे त्यांनी सांगितले आहे.