महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमधून २६ बालमजुरांची सुटका - दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेस

सर्व मुले १२ ते १८ वर्ष वयाच्या आतील आहे. ते बिहार व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागातील असून त्यांना मजुरीसाठी सिकंदराबाद येथे कामासाठी घेऊन जात असल्याचे बालकांनी चाईल्ड लाईनला सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Mar 27, 2019, 3:00 PM IST

नागपूर -दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेसमधून ३५ बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे सुरक्षा बलामार्फत (आरपीएफ) ही कारवाई करण्यात आली.

कारवाई बद्दल माहिती देताना आरपीएपच्या अधिकारी

दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेसमधून बालमजूर नेत असल्याची माहिती आरपीएफला चाईल्ड लाईनद्वारे मिळाली. त्यानुसार आरपीएफ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी सापळा रचला. त्यानंतर चाईल्ड लाईनच्या मदतीने दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेसमधून त्या २६ मुलांची सुटका करण्यात आली. त्यांना नागपूर चाईल्ड लाईनकडे सुपूर्द करण्यात आले.

सर्व मुले १२ ते १८ वर्ष वयाच्या आतील आहे. ते बिहार व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागातील असून त्यांना मजुरीसाठी सिकंदराबाद येथे कामासाठी घेऊन जात असल्याचे बालकांनी चाईल्ड लाईनला सांगितले. त्यानुसार आरपीएफ पुढील तपास करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details