नागपूर -पर्सनल डायरीतील अत्यंत खासगी मजकूर जाणीवपूर्वक काका काकूंनी वाचल्याने दुखावल्या गेलेल्या एका उच्च शिक्षित तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या ( Young Girl Committed Suicide Saoner ) केली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ( Saoner Police Station ) धापेवाडा येथे उघडकीस आली आहे. निकिता डहाट, असे आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आहे. निकीताचा भाऊ पंकजने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काका रत्नाकर आणि काकू मंगला डहाट यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रत्नाकर हे एक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
निकिता डहाट या तरुणीला बालपणापासूनच स्वतःची डायरी लिहिण्याची सवय होती. ज्या गोष्टी ती कुणाला सांगू शकायची नाही. त्या सर्व बाबी ती डायरीत लिहायची. त्यामुळे तिच्या मनावरील ताण हलका व्हायचा. स्वतःच्या व्यस्था, वेदना कुणापुढे मांडण्यापेक्षा डायरीत व्यक्त होणे तिला आवडायचे. काही दिवसांपूर्वी निकिताच्या चुलत बहिणीवर शस्त्रक्रिया झाल्याने काका रत्नाकर डहाट यांनी निकीताला मदतीसाठी नेले होते. त्यावेळी तिला अत्यंत वाईट वागणूक मिळाली. सख्या काका काकूकडून आलेला अनुभव तिने तिच्या खासगी डायरीत लिहून ठेवला होता.