नागपूर -वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले, चारशे विद्यार्थी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रशियामध्ये अडकले होते. त्यापैकी २०० विद्यार्थीना आज 'वंदे भारत मिशन' अंतर्गत मायदेशी परत आणण्यात आले आहे. आज पहाटे विशेष विमानाने हे सर्व विद्यार्थी नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.
राज्यातील चारशे विद्यार्थी, रशियाला वैद्यकीय शिक्षणाकरिता गेले होते. तेव्हा अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, यामुळे ते रशियात अडकून पडले होते. तेव्हा या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार प्रकाश गजभिये यांनी मोहीम सुरू केली होती. त्यांनी याअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या पालकांची कैफियत मांडली होती.