नागपूर -उपराजधानी नागपूरमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीला 200 बॉडीवोर्न कॅमेरे देण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या कॅमेरांचे वाटप करण्यात आले. या कॅमेराचा उपयोग पोलिसांवरील हल्ले रोखण्यास होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन सुरुवात महाराष्ट्रात झाली असल्याचे अनिल देशमुख यांनी यावेळी म्हटले.
हे कॅमेरे उपयुक्त ठरणार -
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांवर हल्ले होत आहे. कर्तव्य बजावताना अनेकदा काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात. उलटपक्षी बरेचदा पोलिसही नागरिकांशी सौजन्याने वगात नसल्याच्या तक्रारी येतात. या दोन्ही धर्तीवर गुन्हेगारी रोखण्यास हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहे. मुंबईनंतर आजपासून उपराजधानी नागपूरात सुद्धा कॅमेरे वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे असणार आहे. यात सध्या नागपूर पोलिसांच्या ताफ्यात 5 ड्रोन आहे. हे 5 किलोमीटर रेडिअसमध्ये फिरून निरीक्षण आणि लक्ष ठेवू शकतात. यात पुढील काळात गरज असल्यास रिलायांसने सीएसआर फंडातून ज्या प्रकारे मुंबईला ड्रोन दिले. त्याच पद्धतीने घेता येईल, असेही ते म्हणाले.
गृहमंत्री म्हणून पाठीशी राहील -