नागपूर- जिल्ह्यात तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा करण्यात आल्याची घटना घडली होती. एवढेच नाही तर या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आर्यन प्रकाश भेंडे(19), ऋषिकेश राकेश कुमरे(21) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहे.
तलवारीने केक कापणे पडले महागात; २ युवकांना अटक - नागपूर लेटेस्ट न्यूज
नागपूर हिलटॉप स्टँड परिसरात रात्रीच्या वेळी वाढदिवस साजरा करताना केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करण्यात आला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

तलवारीने केक कापणे पडले महागात; २ युवकांना अटक
तलवारीने केक कापणे पडले महागात; २ युवकांना अटक
पोलिसांचे आवाहन
आजकाल बंदूक, तलवार किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन फोटो काढले जातात. हे फोटो सोशल मिडियावर टाकत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर याची माहिती संबंधित पोलिसांना देण्याचे आवाहनवरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केले.