नागपूर - जिल्ह्यात आज पुन्हा दोन कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. या दोघांसह एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ वर पोहचली आहे. तर आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी मिळाली आहे. आता २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नागपुरात आढळले आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, जिल्ह्यात एकूण संख्या २९ वर - नागपूर कोरोना रुग्णसंख्या
नवीन नोंद झालेले दोन्ही रुग्ण क्वारंटाईनमध्ये होते. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यता कमी आहे.
नागपुरातील आढळले आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, जिल्ह्यात एकूण संख्या २९ वर
नवीन नोंद झालेले दोन्ही रुग्ण क्वारंटाईनमध्ये होते. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यता कमी आहे. त्या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती एकदम ठीक असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपूर - १२ एप्रिल
एकूण पॉझिटीव्ह नमुने - २९
मृत्यू - ०१
रुग्णालयातून बरे होऊन सुट्टी - ०८
रुग्णालयात उपचार सुरू - २०