नागपूर - जिल्ह्यातील खुर्जापार परिसरात ३३ किलो चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. महाराष्ट्र - मध्य प्रदेश सिमा भागात ही कारवाई करण्यात आली. विधानसभा निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या स्टॅटीस्टीक सर्व्हीलंस टीमने ही कारवाई केली.
खुर्सापार परिसरात ३३ किलो चांदी जप्त; स्टॅटीस्टीक सर्व्हीलंस टीमची करवाई - खुर्सापार परिसरात चांदी जप्त
स्टॅटीस्टीकल सर्व्हीलंस टीमने ३३ किलो चांदीच्या वस्तू महारष्ट्र- मध्य प्रदेश सिमा भागात कार्वाई करत जप्त केल्या. विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर, सावनेर तालुक्यात स्टॅटीस्टीक सर्व्हीलंस टीम तपासणी करत असताना एका कारमधून ३३ किलो चांदीच्या पुजेसाठी लागणाऱ्या विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. एमपी ०९ WC ०१७१ या क्रमांकाच्या कारमधून चांदीच्या या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. राजस्थानवरुन खरेदी केलेली ही चांदीची भांडी इंदूरवरुन नागपूरला आणण्यात येत होती. ही मिश्रित चांदी असल्याचे देखील त्यांनी म्हटले. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरु आहे. या चांदीची किंमत ९ लाख सांगितली जात आहे.