नागपूर - शहराच्या झोन-2 अंतर्गत आलेल्या सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर रात्री उशिरा पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. त्यावेळी तब्बल २० ते २५ तरुण तरुणी त्या ठिकाणी आढळून आले.
नागपूर : दोन अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड - Nagpur police raid on Hookah Parlours
झोन-2 अंतर्गत आलेल्या सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर रात्री उशिरा पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत.
रात्री उशिरा कारवाई करण्यात आली
पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना या संदर्भात माहिती समजली होती की, परिमंडळ दोन अंतर्गत दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी रेड करण्याची सूचना पोलीस पथकाला दिली. त्यानुसार रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही हुक्का पार्लर मालकांना आणि त्यांच्या स्टाफसह हुक्का पिताना आढळलेल्या तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले आहे. एकीकडे हुक्का पार्लरवर शासनाने बंदी घातलेली आहे. त्यातही कोविड-19मुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांनुसार हॉटेल, रेस्टॉरंट बंद ठेण्याचे आदेश आहेत. तरी देखील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरत नगर परिसरात हवेली कॅफेमध्ये हुक्का पार्लर सुरू होते. तर सीताबर्डी पोलीस ठाण्यात हद्दीतील फ्युजन हुक्का पार्लर देखील सुरू असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई हुक्याचे धूर उडवत असल्याची माहिती डीसीपी विनिता साहू यांना मिळाली होती. माहितीची सत्यता पटवल्यानंतर त्या ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आला.
वीस ते पंचवीस तरुण-तरुणी आढळल्या
पोलिसांनी ज्यावेळी हुक्का पार्लरवर छापे टाकले त्यावेळी सुमारे २० ते २५ तरुण आणि तरुणी हुक्का पिताना आढळून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हुक्का पार्लरच्या मालकांसह कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. हुक्का पार्लर मधील सर्व साहित्यदेखील पोलिसांनी जप्त केले आहे.