महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Children Poisoned By Eating Chocolate : चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा, मदन गोपाल हायस्कूलमधील घटना - 17 children poisoned by eating chocolate

नागपूरमध्ये सीताबर्डीच्या मदन गोपाल हायस्कूलमधील (Madan Gopal High School) १७ मुलांना विषबाधा (17 children poisoned by eating chocolate) झाली. त्यांना लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. या मुलांना शाळेच्याबाहेर एका अनोळखी व्यक्तीने चाॅकलेट वाटल्याचे (unknown person given chocolate) समोर आले आहे. latest news from Nagpur, Nagpur Crime, Children Poisoned By Eating Chocolate

Children Poisoned By Eating Chocolate
चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा

By

Published : Dec 3, 2022, 6:13 PM IST

Updated : Dec 3, 2022, 8:31 PM IST

नागपूर : शहरातील सीताबर्डीच्या मदन गोपाल हायस्कूलमधील (Madan Gopal High School) १७ मुलांना विषबाधा (17 children poisoned by eating chocolate) झाल्याने विद्यार्थ्यांना सीताबर्डी येथीलच लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट (unknown person given chocolate) खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. latest news from Nagpur, Nagpur Crime, Children Poisoned By Eating Chocolate

चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा

चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण?मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. या मुलांना शाळेच्याबाहेर एका अनोळखी व्यक्तीने चाॅकलेट वाटल्याचे समोर आले आहे. चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. कोणी वाढदिवशी वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल असे पोलिसांनी सांगितले.

Last Updated : Dec 3, 2022, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details