महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1,592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 617 आत्महत्या मदतीसाठी अपात्र - farmer suicide assistance

कापूस,तूर,गहू आणि भात या पीकांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. नागपूर विभागात सहा जिल्हे येतात. त्यातही मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र आत्महत्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर, वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 623 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jan 29, 2020, 5:26 PM IST

नागपूर -विभागात गेल्या पाच वर्षात कर्जबाजारीपणाला, नापिकी, आणि सावकारी जाच अशा विविध कारणांना कंटाळून 1,592 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र त्यापैकी 617 शेतकरी आत्महत्या या मदत निधीसाठी अपात्र ठरल्या आहेत. केवळ 901 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाने मदत केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही गोष्ट उघड केली.

नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हेही वाचा -आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करून साजरा केला लग्न सोहळा

कापूस,तूर,गहू आणि भात या पीकांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. नागपूर विभागात सहा जिल्हे येतात. त्यातही मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र आत्महत्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. तर, वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 623 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

जिल्ह्यानुसार आत्महत्यांचे प्रमाण

नागपूर - 256
वर्धा - 623
भंडारा - 206
गोंदिया - 107
चंद्रपूर - 352
गडचिरोली - 48

ABOUT THE AUTHOR

...view details