महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Crime : धक्कादायक! 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने बघितले YouTube वर व्हिडिओ अन् केली स्वत:ची प्रसुती; बाळाचा मृत्यू...बलात्काराची तक्रार - पीडित

नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने युट्युबवर व्हिडिओ बघून चक्क स्वतःची प्रसूती केली. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur Crime
अंबाझरी पोलीस स्टेशन

By

Published : Mar 5, 2023, 6:39 PM IST

Updated : Mar 5, 2023, 6:51 PM IST

तपास अधिकारी संतोष बोयने माहिती देताना

नागपूर:शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पंधरा वर्षे तरुणीने युट्युबवर व्हिडिओ बघून चक्क स्वतःची प्रसूती केली. बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या तरुणीची तब्येत बरी नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरूणीवर उपचार सुरू: युट्युबवर व्हिडिओ बघून स्वतःची प्रसूती करणे एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या चांगलेच अंगलट आला आहे. प्रसूती केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तरुणीचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटना नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवजात बाळाची मृत्यू की हत्या?: काही दिवसांपासून पीडितेच्या पोटात दुखत होते. मात्र, घरच्या लोकांना काहीही कळू नये म्हणून तिने युट्युबवर व्हिडिओ बघून स्वतःची प्रसूती करण्याकरिता लागणारे सर्व साहित्याची जुळवा जुळवा करून ठेवली होती. पीडितेची आई कामावर गेली असताना तिला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिने चक्क युट्युब वरचा व्हिडिओ बघून स्वतःचीच प्रसूती केली. या घटेनत बाळाचा मृत्यू झाल्यामुळे तिने बाळाचा मृतदेह लपवून ठेवला होता. पीडित मुलीची आई घरी परतली तेव्हा खोलीत जागोजागी रक्ताचे डाग दिसत होते आणि मुलीची तब्येत देखील खालावलेली होती. पीडितेच्या आईने मुलीची विचारपूस केली तेव्हा हा संपूर्ण प्रकार पुढे आला आहे.

इन्स्टाग्रामवर फुलले प्रेम अन् बलात्कार?: संबंधित घटनेतील तरुणीचे वय केवळ पंधरा वर्ष असून ती इयत्ता नववी मध्ये शिकत असल्याची माहिती पुढे आली आहे. इन्स्टाग्रामवर चॅटिंग करताना काही महिन्यांपूर्वी तिची ओळख एक ठाकूर नावाच्या आरोपी सोबत झाली होती. हळूहळू आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. नऊ महिन्यांपूर्वी आरोपीने पीडित तरूणीला एका ठिकाणी भेटायला बोलावले असता ती तिथे गेली. त्यानंतर आरोपीने तिला मित्राच्या खोली वर नेऊन बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

आरोपीचा शोध सुरू: पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिची आरोपीसोबत ओळख ही इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यातूनच त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. धक्कादायक म्हणणे पीडित तरुणीला आरोपीचे संपूर्ण नावच माहिती नसल्याचे तपासात समोर आले आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी सायबर सेलची मदत घेण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा: Gangrape in Kanpur: नराधम मित्र.. डॉक्टरच्या मुलीवर मित्रांनीच केला बलात्कार, गुंगीचे औषध पाजून केले दुष्कृत्य..

Last Updated : Mar 5, 2023, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details