नागपूर -राज्यात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेक रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांनाही कोरोनाचा धोका वाढला आहे. नागपुरात एका कोरोना पॉझिटिव्ह 68 वर्षीय वृद्धाच्या संपर्कात आलेल्या मेयो रुग्णालयातील 15 डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. या सगळ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 'त्या' सर्व डॉक्टर आणि नर्सेसचा कोरोना अहवाल निगेटिव्ह - कोरोना संसर्ग
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांनाही कोरोनाचा धोक वाढला आहे. नागपूरात एका कोरोना पॉझिटिव्ह 68 वर्षीय वृद्धाच्या संपर्कात आलेल्या मेयो रुग्णालयातील 15 डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. या सगळ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

डॉक्टर
काही दिवसांपूर्वी हा वृद्ध रुग्ण मेयो रुग्णालयात सामान्य रुग्ण म्हणून उपचारासाठी आला होता. मात्र, नंतर न्यूमोनिया सदृश लक्षणांमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू उपरांत झालेल्या कोरोना चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झाले. त्यामुळे त्याच्यावर उपचार करणारे सर्व 15 डॉक्टर आणि परिचारिका संशयाच्या भोवऱ्यात आले होते. आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागपुरकरांना दिलासा मिळाला आहे. सध्या नियमाप्रमाणे या सर्वांना 14 दिवस होम क्वारेन्टाईन करण्यात आले आहे.