नागपूर -मोबाईल फोनवर गेम खेळू न दिल्याने 13 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने 13 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या - नागपूर लेटेस्ट न्यूज
प्रिन्सने रागाच्या भरात मोबाईल फेकून दिला आणि गच्चीवर गेला. बराच वेळ होऊनही प्रिन्स खाली न आल्याने त्याची आई गच्चीवर गेली. त्यावेळी तो दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारीदेखील मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत प्रिन्सचा मृत्यू झाला होता.
प्रिन्स खानकुळे, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो नगरधन येथे त्याची आई, वडील आणि सात वर्षीय बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने तो घरीच राहायचा. त्यामुळे तो सतत मोबाईलवर गेम खेळत असायचा. नेहमीप्रमाणे बुधवारी तो मोबाईलवर गेम खेळत होता. त्यावेळी त्याच्या आईने गेम खेळू नको, असे हटकले. त्यानंतर प्रिन्सने रागाच्या भरात मोबाईल फेकून दिला आणि गच्चीवर गेला. बराच वेळ होऊनही प्रिन्स खाली न आल्याने त्याची आई गच्चीवर गेली. त्यावेळी तो दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारीदेखील मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत प्रिन्सचा मृत्यू झाला होता.