नागपूर- कोरोना हा लहान मुलांना होत नाही असा गैरसमज होता. पहिल्या लाटेत नसले तरी दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे अनेक उदाहरण पाहायला मिळाले. यातून आणखी गंभीर म्हणजे 'म्यूकरमायकोसिस' हा आजार लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो असे आता पुढे येऊ लागले आहे. नागपुरात एका 12 वर्षीय मुलीवर 'म्यूकरमायकोसिस' झाल्यानंतर उपचार करण्यात आला. काय आहे हा प्रकार, कशी घ्यायची काळजी हे जाणून घेऊ खास 'ईटीव्ही भारत'च्या खास वृत्तांतमधून
लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो 'म्यूकरमायकोसिस
लहान मुलीत म्यूकरमायकोसिसचे लक्षण
अकोला जिल्ह्यातील आकोट येथील 12 वर्षीय चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्यानंतर म्यूकरमायकोसिस हा आजार झाला होता. नागपुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद भुतडा यांच्याकडे तिच्यावर उपचार सुरू होते. नाकातून काळ्या रंगाचे द्रव्य आणि सूज आल्याने लक्षात आल्यावर उपचार करण्यात आले. यातून तिच्या महिन्याभर उपचार करून जवळपास पाच ते सहावेळा एंडोस्कोपी करून उपचार करण्यात आला. सध्या तिची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे. या लहान मुलीला कोरोनाची लागण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात म्यूकरमायकोसिसचे लक्षण दिसून आल्याचे पुढे आले आहे. मूळची अकोला जिल्ह्यातील आकोटची ही 12 वर्षाची चिमुकलीच्या नाकातून काळ रंगाचे द्रव्य बाहेर निघताना दिसून आले. यासोबत डोळ्यावर सूज आली. दात हलायला सुरुवात झाली. यावेळी तिच्या शरीरात साखरेचे प्रामाणही अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कायघ्यावीकाळजी
यात साखरेचे प्रमाण शरीरात वाढू नये हे एक महत्वाचे कारण पुढे येत आहे. यासोबतच रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने किंवा इतर व्याधी असताना याचे लक्षण दिसून येतात. हा रोग नवीन नक्कीच नाही. यात जर लहान मुलांना कोरोना झाला असेल आणि प्रकृती गंभीर झाली असेल उपचार करताना अति दक्षता विभागात (आयसूयी) ठेवावे लागले असल्या अशा लहान रुग्णांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
यात बहुतांश रुग्णांमध्ये साधरण काळ्या रंगाचे नाकातून द्रव्य निघणे, डोळ्यांवर सूज, दात जबडे हलने असे लक्षणे दिसतात. यासोबत लहान मुलांना ताप आल्यास तो कमी होत नसल्यास डोके दुखत असल्यास याशिवाय वरील काही कारणे दिसल्यास हा आजार होण्याची भीती अधिक आहे. यात असे लक्षण किंवा साखरेचे प्रणाम लहान मुलांमध्ये वाढलेले असल्यास विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
काय सांगताततज्ज्ञ
आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे लक्षण असलेले सुमारे 600 जणपुढे आले आहेत. यात जवळपास 450 लोकांच्या शास्त्रकिया झाल्या आहेत. 26 जणांचा यात मृत्यू झाला. यामुळे घाबरून न जाता योग्य पद्धतीने काळजी घेण्याची गरज आहे. आतापर्यंतच्या रुग्णांत सर्वात लहान वयामध्ये 22 वर्षांपर्यंत रुग्ण आल्याची नोंद आहे. लहान मुलांमध्ये प्रमाण कमी आहे. पण असे असले तरी काळजी घेणे महत्वाचे आहे. सर्वात पहिले शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. पण वेळीच लक्ष दिल्यास यावर उपचार होऊ शकतो, अशी माहिती म्यूकरमायकोसिसचे टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा कान, नाक, घसा विदर्भ वैद्यकीय संघटनेचे डॉ. प्रशांत निखाडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -तलावात बुडून बाप-लेकाचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल