महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर रेल्वे स्थानकात १२ लाख ८८ हजार जप्त, संशयित ताब्यात - money

नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकात एका संशयित व्यक्तीकडे तब्बल १२ लाख ८८ हजारांच्या नोटा आढळल्या आहेत. याप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी मन्सूर खान यास ताब्यात घेतले आहे.

नागपूर पोलिसांनी जप्त केलेली रोकड

By

Published : May 15, 2019, 3:10 AM IST

नागपूर - नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकात एका संशयित व्यक्तीकडे तब्बल १२ लाख ८८ हजारांच्या नोटा आढळल्या आहेत. याप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी मन्सूर खान यास ताब्यात घेतले आहे.

नागपूर पोलिसांनी जप्त केलेली रोकड
मंगळवारी संध्याकाळी फलाट क्रमांक ३ वर आरपीएफचे आरक्षक विकास शर्मा गस्त घालत होते. या दरम्यान एका ५५ वर्षीय व्यक्तीच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटू लागल्या. त्या व्यक्तीची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तर मिळाल्याने त्यांचा संशय बळावला. शर्मा यांनी त्या व्यक्तीकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली. त्यात त्यांना १२ लाख ८८ हजारांची रोख रक्कम आढळली. या रकमेविषयी ठोस उत्तर देऊ न शकल्याने आरपीएफने संशयित मन्सूर खान यास ताब्यात घेतले.

नागपूर रेल्वे स्थानकातील अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी निर्देश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसह विविध प्रकारची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफ पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details