नागपूर-शिर्डी पालखी पदयात्रा आणि रथयात्रेसाठी नागपुरातील प्रसिद्ध साई मंदिर परिसरात अकराशे किलो उपवासाची साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली आहे. येथील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही खिचडी तयार केली आहे. यासाठी गेल्या 5 दिवसांपासून तयारी करण्यात आली होती.
तब्बल अकराशे किलोची साबुदाणा खिचडी...
नागपूर ते शिर्डी पदयात्रेत प्रसादासाठी बनवण्यात आलेल्या खिचडीसाठी 500 किलो साबुदाणा, 300 शेंगदाणे, 100 किलो तूप, जिरा, 50 किलो हिरवी मिरची, मीठ, 100 किलो साखर वापरण्यात आली आहे. सुमारे 100 लोकांनी प्रत्यक्षपणे या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या भीतीने परदेशातून आलेल्या दोन जणांवर पाळत
नागपूर ते शिर्डी पदयात्रेत प्रसादासाठी बनवण्यात आलेल्या खिचडीसाठी 500 किलो साबुदाणा, 300 शेंगदाणे, 100 किलो तूप, जिरा, 50 किलो हिरवी मिरची, मीठ, 100 किलो साखर वापरण्यात आली आहे. सुमारे 100 लोकांनी प्रत्यक्षपणे या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. तर शेकडो लोक अप्रत्यक्ष पणे सहभागी झाले होते. अकराशे किलो उपवासाची साबुदाणा खिचडी तयार करण्याचा प्रयत्न असला तरी प्रत्यक्षात खिचडी मात्र 1 हजार 400 किलोची तयार झाल्याचा दावा शेफ विष्णू मनोहर यांनी केला आहे.