नागपूर - जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच मोबाईलच्या वादातून एका मुलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता चक्क समोशासाठी एका ११ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.
नागपूरातील गिट्टीखदान परिसरात ही दुर्देवी घटना घडली आहे. वीरू शाहू असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वीरूच्या मोठ्या भावाला आईने समोसा घेण्यासाठी पैसे दिले, म्हणून आपल्यालाही पैसे हवे अशी मागणी त्याने आईकडे केली होती. आईनेदेखील त्याला घरातून पैसे घेऊन घे, असे सांगितले. पैसे घेऊन त्याने समोसा आणला. त्यानंतर तो घरात गेला, परंतु तो बराच वेळ घरात काय करतोय म्हणून आईने देखील घरात जाऊन बघितले तर वीरूने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसताच एकच आक्रोश केला.