महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Winter Session : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नागपुरात विविध संघटनांचे निघणार 11 मोर्चे

दोन आठवडे चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ( Winter session in Nagpur ) विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून 11 मोर्चे निघणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी आठ संघटनांना मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली होती. एकूण 20 धरणे किंवा धरणे आंदोलने आणि उपोषणांनाही पोलिसांनी परवानगी दिली आहे.

Winter session
नागपूरात विविध संघटनांचे निघणार 11 मोर्चे

By

Published : Dec 20, 2022, 10:57 PM IST

नागपूर : शहरात कोविडनंतर प्रथमच दोन वर्षानंतर हिवाळी अधिवेशनाला ( Winter session in Nagpur ) सोमवार पासून सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलनाची हाक पुकरण्यात आली आहे. नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून विविध मागण्यांसाठी तब्बल 11 मोर्चे काढण्यात येणार आहेत.

विविध संघटनांकडून 11 मोर्चे :

स्वतंत्र मजदूर युनीयनचा मोर्चा :या संघटनेद्वारे 1000 महिला व पुरूषांना सोबत घेऊन यशवंत्त स्टेडीयम येथून मोर्चा निघून गुंज चौक,आंनद टॉकीज लोखंडी पूल, मानस चौक ते स्टॉपिंग पॉईंट टेकडी रोड दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे.

हिंदू जनजागृती समिती : या संघटनेद्वारे 5000 महिला व पुरूषांना सोबत घेऊन यशवंत स्टेडीयम येथून मोर्चा निघून मंजे चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी टॉकीज, स्टॉपिंग पॉईंट ते मॉरिस कॉलेज चौक पर्यंत निघणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details