नागपूर- अनके लोक नियमाचे पालन करत नाही म्हणून मी कशाला करू असे म्हणण्यापेक्षा एक पणती लावा आणि या देशाचा अंधकार दूर करा हेच तुम्हाला सांगणे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विकास शिरपूरकर यांनी व्यक्त केलेत. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठच्या 108 व्या दीक्षांत समारंभावेळी बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आभासी पद्धतीने दीक्षांत सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विकास शिरपूरकर हे उपस्थित होते. प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे हे उपस्थित होते.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीक्ष शरद बोबडे यांना डी.लीट म्हणजेच विधी पंडित ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पण, ते प्रत्यक्ष स्वतः उपस्थित न राहू शकल्याने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास बोबडे यांनी ही पदवी स्वीकारली.
पर्यावरण संवर्धनासाठी नवे मार्ग शोधा