महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णसंख्येचे शतक पूर्ण - जागतिक आरोग्य आणीबाणी

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०५ इतकी झाली आहे. त्यापैकी १०१ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर, चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या नागपुरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये सुमारे १,५०० नागरिक दाखल आहेत.

नागपुरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्ण संख्येचे शतक पूर्ण
नागपुरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्ण संख्येचे शतक पूर्ण

By

Published : May 13, 2020, 12:43 PM IST

Updated : May 13, 2020, 11:51 PM IST

नागपूर -एकीकडे नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशेच्या पुढे गेली आल्याने चिंता वाढत आहे. तर, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही शंभरच्या पुढे गेली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. येत्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा वाढेल, अशी परिस्थिती निर्माण होईल.

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०५ इतकी झाली आहे. त्यापैकी १०१ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर, चार रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या नागपुरातील विविध विलगीकरण केंद्रांमध्ये सुमारे पंधराशे नागरिक दाखल आहेत. त्यांची चाचणी घेतली जात आहे. विलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा येथील नागरिकांचा मोठा समावेश आहे.

Last Updated : May 13, 2020, 11:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details