नागपूर -जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खडसा येथे वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
'टायगर कॅपीटल'मध्ये पुन्हा एका वाघाचा मृत्यू, ८ दिवसातील दुसरी घटना
नागपूर जिल्ह्याची 'टायगर कॅपीटल' म्हणून ओळख आहे. मात्र, एकाच आठवड्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच आठवड्यात रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीटमध्ये सुद्धा एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आता वाघ आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
नागपूर जिल्ह्याची 'टायगर कॅपीटल' म्हणून ओळख आहे. मात्र, एकाच आठवड्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याच आठवड्यात रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीटमध्ये सुद्धा एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात आता वाघ आढळून आल्याने खळबळ माजली आहे. वाघाचा मृतदेह दिसताच ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली. या वाघाच्या अंगावर कुठेही जखमा नाहीत. त्यामुळे त्याची शिकार झाली किंवा दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू झाल्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
हे वाचलं का? - नागपूरमध्ये बिहाडा खाणीतील खड्ड्यात बुडून वाघाचा मृत्यू