नागपूर- शहरात यंदा तापमानाने उच्चांक गाठला होता. याचाच सदुपयोग करत नागपूर मेट्रोने तब्बल १ लाख युनिट सौरऊर्जेची निर्मिती केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजेची बचत होणार आहे.
नागपूर मेट्रोला यंदाच्या तापमानाचा फायदा; तब्बल १ लाख युनिट सौरऊर्जेची निर्मिती
नागपूर मेट्रो सर्वात पहिली ग्रीन मेट्रो आहे. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मेट्रोला लागणाऱ्या वीजेपैकी ६५ टक्के वीज मेट्रोद्वारे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजेच्या बचतीसोबतच प्रदुषणावरही नियंत्रण राहणार आहे.
नागपूर मेट्रो सर्वात पहिली ग्रीन मेट्रो आहे. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मेट्रोला लागणाऱ्या वीजेपैकी ६५ टक्के वीज मेट्रोद्वारे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजेच्या बचतीसोबतच प्रदूषणावरही नियंत्रण राहणार आहे. यासाठी महामेट्रोने खापरी स्टेशनवर २०९, न्यू एयरपोर्टला ३४६, एयरपोर्ट साऊथला ४०७, तर एयरपोर्ट स्टेशनला ५४० सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. यासोबतच मेट्रो भवन येथे ८४० सोलर पॅनल बसवले आहे. आतापर्यंत मेट्रोद्वारे एकूण २ हजार ३४२ सोलर पॅनल बसवले आहे. त्याद्वारे फक्त मे महिन्यात १ लाख ४ हजार ३०७ युनिट सौरऊर्जेची निर्मिती करण्यात आली आहे. लवकरच इतर स्टेशनदेखील तयार होणार आहेत. त्याठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.