नागपूर- शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चारचाकी वाहनांतून 1 कोटी 1 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही रक्कम जप्त केली.
नागपुरात दोन ठिकाणाहून १ कोटीची रक्कम जप्त - नागपुरात १ कोटीची रक्कम जप्त
नागपुरात जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार कारवाई सुरू आहे. यामध्येच त्यांनी १ कोटी १ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
पहिली कारवाई मध्य नागपुरातील पाचपावली परिसरात केली. यामध्ये जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांनी एका कारमधून 71 लाख आणि 5 लाख, अशी एकूण 76 लाखांची रोकड जप्त केली आहे. कारमध्ये ही रोकड एका पेटीमध्ये ठेवण्यात आली होती.
दुसरी कारवाई रेल्वे स्थानकाजवळी मानस चौकाजवळ करण्यात आली. सायंकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पथक वाहनांची तपासणी करताना एका ओला कारमधून 25 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. ओलामध्ये प्रवास करणारे प्रवासी त्या रकमेबद्दल पोलिसांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम निवडणूक अधिकारी आणि आयकर अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली. दोन्ही प्रकरणात सध्या चौकशी सुरू असून रोकड कोणाची आहे? आणि कुठे नेली जात होती याची माहिती अधिकारी घेत आहेत.