मुंबई - मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी १० वाजता प्रकाश गायकवाड (वय २९) या तरुणाने लोकल समोर उडी घेऊन आत्महत्या केली. स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला धीम्या मार्गावरील फलाट क्रमांक २ वर सामान्य प्रवाशाप्रमाणे लोकलची वाट पाहत तरुण थांबला होता. घरची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे या अविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकात धावत्या लोकल समोर उडी घेऊन एकाची आत्महत्या - local
यावेळी विद्याविहार स्थानकातील लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी तरुणाला जखमी अवस्थेत लोकल खालून बाहेर काढले पण त्यावरून लोकल गेली असल्याने जास्त मार लागला होता. २९ वर्षांचा प्रकाश गायकवाड हा कांजूरमार्ग येथील एसआरए इमारती मधील रहिवासी होता.
यावेळी विद्याविहार स्थानकातील लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी तरुणाला जखमी अवस्थेत लोकल खालून बाहेर काढले पण त्यावरून लोकल गेली असल्याने जास्त मार लागला होता. २९ वर्षांचा प्रकाश गायकवाड हा कांजूरमार्ग येथील एसआरए इमारती मधील रहिवासी होता. अकाली वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे घरची जबाबदारी प्रकाशवर आली होती. लहान भावाला अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे तो अंथरुणाला खिळून होता. घरची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय प्रकाशने घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी प्रकाश गायकवाड यास घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जखमी अवस्थेत भरती केले होते. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारे कोणतेही पत्र सापडलेले नाही. शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास कुर्ला लोहमार्ग पोलीस करत आहेत.